खारघरमध्ये रंगणार भाजप सांस्कृतिक महोत्सव

 खारघरमध्ये रंगणार भाजप सांस्कृतिक महोत्सव

महोत्सवात मनोरंजन, इतिहास, कला तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातील मिसळ महोत्सवाचा संगम

पनवेल(प्रतिनिधी) महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून भाजप सांस्कृतिक महोत्सव १ ते ४ मेदरम्यान खारघर सेक्टर १२ येथील गावदेवी मैदानावर रंगणार आहे. या महोत्सवात मनोरंजन, इतिहास, कला तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातील मिसळ महोत्सवाचा संगम पहायला मिळणार आहे. 
         खारघर भाजप आयोजित या महोत्सवात १ मे रोजी सायंकाळी ६ वाजता ९० कलाकारांच्या संचासह महाराष्ट्राची महासंस्कृती कार्यक्रम होईल. यात आपल्या राज्याच्या विविध सांस्कृतिक परंपरा आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याचे भव्य सादरीकरण होणार आहे. २ मे रोजी सायंकाळी ६ वाजता खारघर आणि पनवेल परिसरातील विविध संस्थांचा सांस्कृतिक कलाविष्कार, ३ मे सायंकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे यांच्या सुमधुर गाण्यांची मैफल होईल. या वेळी निवेदक म्हणून विघ्नेश जोशी उपस्थित असतील. या महोत्सवात चारही दिवस सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत महाराष्ट्राच्या विविध भागांतील चविष्ट मिसळचे स्टॉल्स असणारा मिसळ महोत्सव तसेच ऐतिहासिक शस्त्रांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.