पनवेल महापालिकेच्यावतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन-महापालिका कार्यक्षेत्रातील बेरोजगार तरूणांनी याचा लाभ घ्यावा: आयुक्त मंगेश चितळे
पनवेल, दि.09 : पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १३ एप्रिल २०२५, रविवार रोजी दी.बा.पाटील विद्यालय, आगरी समाज हॉल समोर पनवेल येथे महापालिकेच्यावतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या संधीचा महापालिका हद्दीतील तरूण तरूणांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
या मेळाव्यात ५ वी पास ते पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, एमबीए, बीई, फायनान्स इत्यादी सर्व क्षेत्रातील उमेदवार सहभागी होऊ शकतात. उमेदवारांचे वय १८ ते २८ दरम्यान असावे. मेळाव्यात निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती पत्र दिले जाणार आहे. उमेदवारांनी बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो, आणि शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती (५ प्रतींमध्ये) घेऊन उपस्थित राहावे. महापालिकेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या या भव्य रोजगार मेळाव्यासाठी निष्केन फाऊंडेशनची नेमणूक करण्यत आली आहे.
चौकट
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक किंवा QR कोड वापरावा: https://forms.gle/KRRBZnGVUDCFVMj77
वेळ: सकाळी ९ ते संध्या ५
संपर्क: ७३९१९ ६६२९५ / ९५११९ १०३५०