गव्हाणच्या शांतादेवीला महेंद्रशेठ घरत यांच्याकडून सोन्याचा हार अर्पण

 गव्हाणच्या शांतादेवीला महेंद्रशेठ घरत यांच्याकडून सोन्याचा हार अर्पण





उरण दि २२(विठ्ठल ममताबादे)पनवेल तालुक्यातील गव्हाणच्या शांतादेवीची यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.  शांतादेवी नवसाला पावते, अशी वर्षानुवर्षे भाविकांची श्रद्धा आहे.  आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत हे सुद्धा शांतादेवीचे निस्सीम भक्त आहेत. दर मंगळवारी महेंद्रशेठ घरत न चुकता देवीचे दर्शन घेऊन पुढील नियोजित कार्यक्रमांना जातात.अशा या प्रसिद्ध शांतादेवीची यात्रा आजपासून सुरू झाली आहे.गेल्यावर्षी सुद्धा यात्रेच्या दिवशी महेंद्रशेठ घरत यांच्याकडून शांतादेवीला सोन्याचा हार अर्पण करण्यात आला होता. देवीवर अपार श्रद्धा असल्यामुळे यावर्षीही यात्रेच्या दिवशी  महेंद्रशेठ घरत यांनी शांतादेवीला सोन्याचा हार अर्पण केला.यावेळी शुभांगीताई घरत, कुणाल घरत, शेजल घरत यांनी सहकुटुंब शांतादेवीची खणानारळाने ओटी भरली आणि देवीची मनोभावे प्रार्थना केली. यावेळी महेंद्रशेठ घरत यांच्यासोबत घरत परिवार उपस्थित होता. गिरोबा देव आणि राम मंदिर, जरी मरी आई मंदिरातही ते सहपरिवार गेले होते.महेंद्रशेठ घरत यांनी गव्हाण येथील जरी मरी आई मंदिरासाठी ३ लाखांची देणगी दिली होती. त्यांच्यामुळेच मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले; परंतु जरी मरी आई मंदिर उदघाटनावेळी महेंद्रशेठ घरत हे आयटीएफ बैठकीसाठी लंडनला होते. त्यामुळे आज जरी आई देवी मंदिर व्यवस्थापनातर्फे, तसेच शांतादेवी  मंदिरातर्फे महेंद्रशेठ घरत यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, वसंत म्हात्रे, पांडूशेठ, काशिनाथ कोळी, अरुण कोळी, भरत कोळी, विजय घरत आदी मान्यवर उपस्थित होते.

Popular posts
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image