पनवेल महानगरपालिका अतिरीक्त आयुक्तपदी गणेश शेटे रुजू


पनवेल महानगरपालिका अतिरीक्त आयुक्तपदी गणेश शेटे रुजू

पनवेल,दि.1:   विभागीय आयुक्त कार्यालय कोकण विभाग येथे उपायुक्त असलेले तथा महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी, गट-अ संवर्गातील उपायुक्त गणेश शेटे यांची पनवेल महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त, या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात  आली असून आज ते रुजू झाले.

    आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांची त्यांनी मुख्यालयात  भेट घेऊन  अतिरीक्त आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी सर्वांच्या वतीने  आयुक्तांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

    यापूर्वी श्री.शेटे यांनी पनवेल महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी कार्य केलेले आहे. त्यावेळी महापालिकेचा मालमत्ता कर हा विभाग त्यांच्याकडे होता. त्यादरम्यान  त्यांनी हा विभाग अधिकाधिक जनताभिमुख कसा होईल यासाठी विशेष प्रयत्न केले होते.

Popular posts
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
यूथ महाराष्ट्र संपादिका दिपालीताई पारसकर यांचा वाढदिवस साजरा – सामाजिक उपक्रमातून अनोखा आदर्श
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image