आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते 'प्रज्ञासूर्य' जयंती विशेषांकाचे प्रकाशन

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते 'प्रज्ञासूर्य' जयंती विशेषांकाचे प्रकाशन 



 पनवेल (प्रतिनिधी)भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून रसायनी येथील पत्रकार आनंद पवार यांनी प्रकाशित केलेल्या प्रज्ञासूर्य अंकाचे प्रकाशन पनवेलचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते व महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक साजन बेंद्रे व विशाल यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन पनवेल येथे पनवेल महानगर पालिकेचे माजी नगरसेवक ऍड. प्रकाश बिनेदार यांनी आयोजित केलेल्या भीम जयंती महोत्सवात करण्यात आले.
            या प्रकाशन सोहळ्याला भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा आंबेडकर चळवळीचे झुंजार नेते प्रकाश बिनेदार, माजी नगरसेविका दर्शना भोईर, कामगारनेते रवी नाईक, अविनाश गायकवाड, विनोद जोशी, ज्येष्ठ पत्रकार श्याम साळवी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
              पत्रकार आनंद पवार हे दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त प्रज्ञासूर्य या विशेष अंकाच प्रकाशन करत असतात प्रज्ञासूर्य या जयंती विशेष अंकामध्ये डॉ.बाबासाहेबांच्या जीवनपटावर आधारित महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांचे लेख कविता या प्रज्ञासूर्य अंकामध्ये प्रकाशित केले जातात.प्रज्ञासूर्य हा विशेषांक वाचकांसाठी लोकप्रिय ठरले असल्याची प्रतिक्रिया साहित्यिक लेखक व सामान्य वाचकांमधून व्यक्त होत आहे.