मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर एनएमएमटी बस मार्गाचे सुधारित वेळापत्रक
मुंबई(प्रतिनिधी)-नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत नेरूळ सेक्टर 46-48, नेरूळ बस स्थानक, सीबीडी, घणसोली - घरोंदा, पनवेल रेल्वे स्थानक, खारघर सेक्टर 35, खारकोपर रेल्वे स्थानक या ठिकाणहून मंत्रालय (वर्ल्ड ट्रेड सेंटर) करिता वातानुकूलित बस सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
मार्गावरील दैनंदिन बस संचलन सुरळीत राहणेकरिता कार्यान्वित असलेला कोणताही मार्ग बंद न करता मार्ग क्र.106, मार्ग क्र.108, मार्ग क्र.110 व मार्ग क्र.114 या मार्गाचे सुधारीत वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.
1. मार्ग क्र. 106 – पनवेल रेल्वे स्थानक ते मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर
2. मार्ग क्र. 108 – नेरूळ सेक्टर 46/48 ते मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर
3. मार्ग क्र. 110 – खारघर सेक्टर 35 ते मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर
4. मार्ग क्र. 114 – घणसोली घरोंदा ते मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर
तसेच मार्ग क्र.107 – सिबीडी - मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर, मार्ग क्र.115 – खारकोपर रेल्वे स्थानक - मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर,
मार्ग क्र.116 – तुर्भे/नेरूळ - मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर मार्गे ‘अटल सेतू’ व मार्ग क्र.117 – खारघर/पनवेल - मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर मार्गे ‘अटल सेतू’ या मार्गावरील कार्यान्वित वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आला नाही.
सदर मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी उपरोक्त सुधारीत वेळापत्रकाची नोंद घेवून सहकार्य करण्याबाबत परिवहन प्रशासनाने विनंती केली आहे.