पनवेलच्या स्वस्तिका घोषला महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

 पनवेलच्या स्वस्तिका घोषला महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर



पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा मंगळवारी  करण्यात आली. हा मानाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (सन 2023-24) करिता पनवेलच्या स्वस्तिका घोष हिला टेबल टेनिस खेळात जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण पुण्यात शुक्रवारी (दि.१८)सकाळी ११ वाजता बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्वस्तिकाला मिळणारा पुरस्कार पनवेलकरांसाठी अभिमानाची बाब आहे.
       या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. स्वस्तिका घोषला प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाल्याने तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.    
आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वस्तिका घोष ही जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी कॉलेजची विद्यार्थिनी आहे. खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलमध्ये स्वस्तिकाने इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर आता ती खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात (स्वायत्त) बीएमएसचे शिक्षण घेत आहे. स्वस्तिकाने देशात व परदेशात झालेल्या टेबल टेनिस स्पर्धेत चमकदारी कामगिरी करीत देशाचे नाव उंचाविले आहे.
        गेल्या दहा वर्षांपासून ती महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करीत आहे. खारघरच्या रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये ती दररोज सहा तास खेळाचा सराव करीत असते. स्वास्तिकाचे वडील संदीप घोष हे या खेळातील प्रशिक्षक आणि सल्लागार आहेत. जाहीर झालेल्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराबाबत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना स्वस्तिकाचे वडील संदीप घोष यांनी सांगितले की, टेबल टेनिससाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिकाला वेळोवेळी आर्थिक मदत करण्याबरोबरच प्रशिक्षणासाठी खारघर येथील विद्यालयात विशेष सोय केली आहे. स्वस्तिकाच्या या यशाचे संपूर्ण श्रेय जनार्दन शिक्षण प्रसारक संस्था, लोकनेते रामशेठ ठाकूर यांना जाते. 

Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image