नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत Central Equipment Identity register (CEIR)पोर्टलचा प्रभावीपणे वापर करून मोबाईल चोरीचा सामना
पनवेल/प्रतिनिधी
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत Central Equipment Identity register (CEIR)पोर्टलचा प्रभावीपणे वापर करून मोबाईल चोरीचा सामना करण्यासाठी तसेच गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी आणि मोबाईल सुरक्षा वाढवण्यासाठी त्या अनुषंगाने पनवेल तालुका पोलीस ठाणे, नवी मुंबई हद्दीतील सन 2025 माहे मार्चपर्यंतचे गहाळ झालेल्या मोबाईलपैकी एकूण 48 मोबाईलचा CEIR पोर्टलव्दारे पनवेल तालुका पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजानन घाडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री आनंद कांबळे, दिलेल्या सुचनाप्रमाणे सहा.पोलीस निरीक्षक अनुरूध्द गिजे, पोलीस उप निरीक्षक हर्षल राजपुत, पोहवा 569/ महेश धुमाळ, पोहवा 2700/सुनिल कुदळे, पोशि 3613/भिमराव खताळ यांनी विविध राज्यातुन आतापर्यंत एकुण 48 मोबाईल फोनची अंदाजे 5,76,000/-
रुपये किंमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.
तरी सदरचे हस्तगत केलेले मोबाईल फोन हे दि. 17/03/2025 रोजी तक्रारदार यांना पोलीस ठाणेस बोलावुन त्यांचे मोबाईल फोन त्याच्या ताब्यात दिले
सविनय सादर
गजानन घाडगे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
पनवेल तालुका पोलीस ठाणे