पनवेल नैना प्रभावित क्षेत्रातील घरांचे बंद असलेले खरेदी-विक्री रजिस्ट्रेशन सुरु करण्यासंदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोबत तातडीची बैठक

पनवेल नैना प्रभावित क्षेत्रातील घरांचे बंद असलेले खरेदी-विक्री रजिस्ट्रेशन सुरु करण्यासंदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोबत तातडीची बैठक

मुंबई/प्रतिनिधी,दि.२६-पनवेल नैना प्रभावित क्षेत्रातील बांधकामांमधील घरांचे बंद असलेले खरेदी विक्री रजिस्ट्रेशन सुरु करण्यासंदर्भात मार्ग निघावा यासाठी अधिवेशन काळात एक तातडीची विशेष बैठक आयोजित करण्याची मागणी आ. विक्रांत पाटील यांनी केली होती, त्यानुसार राज्याचे महसूल मंत्री सन्मा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात या संदर्भात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

गेले काही महिन्यांपासून बंद असलेले खरेदी विक्री रेजिस्ट्रेशन 

हा शेतकरी व नागरिकांचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने ते त्वरित सुरु करणे संदर्भात मागणी आ. विक्रांत पाटील यांनी केली. या विषयात ठोस धोरण कसे तयार करता येईल या विषयी सकारात्मक चर्चा या बैठकीत  झाली. 

नैना क्षेत्रातील बांधकामे संरक्षित करणे व ग्रामस्थांच्या नैना विषयी सर्व अडचणी दूर करण्याची मागणी आ. विक्रांत पाटील यांनी सातत्याने  केली असून या विषयात विशेष लक्षवेधी लावून शासनाचे लक्ष ही वेधून घेतले होते. त्यांच्या माध्यमातून या विषयाचा सतत पाठपुरावा सुरु असून या मागण्यांनुसार  सिडको प्रशासनाने या विषयात सकारात्मकता दाखवली आहे, मग या विषयात खरेदी विक्री रेजिस्ट्रेशन सुरु करण्यासंदर्भात ही सिडको ने सकारात्मक भूमिका घ्यावी ही मागणीही आ. विक्रांत पाटील यांनी केली आहे. सदर विषयात तातडीने धोरण तयार करून नागरिकांना दिलासा द्यावा असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री सन्मा चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही सिडको व नोंदणी महानिरीक्षक यांना दिले.

एकंदरीत या विशेष बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने या बरेच महिने रखडलेल्या नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या विषयात मार्ग निघण्याच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत.

या बैठकीला मा. कोकण म्हाडा सभापती श्री. बाळासाहेब जी पाटील, सिडको अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल, राज्याचे नोंदणी महा निरीक्षक (IGR) श्री रवींद्र बिनवाडे, सिडको व मुद्रांक शुल्क विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image