झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन आमदार प्रशांत ठाकूर हेच करणार - पत्रकार शंकर वायदंडे

झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन आमदार प्रशांत ठाकूर हेच करणार - पत्रकार शंकर वायदंडे 



पनवेल (प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्वसामान्य माणसाची जाण आहे, झोपड्पट्टीवासियांच्या हितासाठी त्यांनी मागणी आणि त्या अनुषंगाने पाठपुरावा कायम ठेवला आहे, त्यामुळे झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन आमदार प्रशांत ठाकूर हेच करणार आहेत, असा ठाम विश्वास नवीन पनवेल पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पत्रकार शंकर वायदंडे यांनी व्यक्त केला.      
        पत्रकार शंकर वायदंडे यांनी झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत मत व्यक्त करताना म्हंटले कि, एसआरए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण  मुंबई मधील झोपडपट्टी पुनर्वसन साठी १९९५ ला स्थापना झाली.  बृहन्मुंबई महानगरपालिका परिसरातील उपनगरे, ठाणे, कल्याण, विरार, बदलापूर आणि पनवेल यांना ही लागू केली पनवेलला २०२० साली एसआरए लागू झाली असून प्रत्यक्ष पनवेल ची झोपडपट्ट्या भूखंडाची परिस्थिती पाहता काही खाजगी मालकी, सिडको, रेल्वे, पालिका, एमआयडीसी आदी भूखंडावर झोपडपट्ट्या आहेत. एसआरए लागू होण्यासाठी ५१ टक्के पेक्षा जास्त लोकांनी योजनेत संमत होणे, भूखंड मालकाचे संमती, विकासक नेमणे अशा अटी आहेत.  मुळात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी एकही झोपडीला बेघर होऊ देणार नाही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वांना परवडेल अशी घरे देण्याची घोषणा केली आहे आणि तशी मागणी आणि सातत्याने ते पाठपुरावा करत आहेत. असे असताना काही शेकाप पुरस्कृत माजी नगरसेवक व नेत्यांनी एसआरएचा घाट घातला असल्याचे पत्रकार शंकर वायदंडे यांनी लक्षात आणून दिले असून मुळात त्याला ५१ % लोक सहमत होणार नाहीत तसेच भूखंडावरील जागा मालकाची सहमती मिळणे शक्यता कमी आहे आणि  सिडको हद्दीतील पंचशील नगर, नवनाथ नगर या झोपड्यांचे भूखंड विकास आराखड्यानुसार रेल्वेला दिला आहे त्यामुळे पंचशील नगर व नवनाथ नगर या झोपडपट्टीचे पुनर्वसन साठी सिडको संमती देईल का ? असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.                एसआरए योजनेच्या अनुषंगाने सन २००० पर्यंतच्या झोपड्यांना मोफत तर २०१० पर्यंतच्या झोपड्यांना सशुल्क २ लाख ५० हजार भरून घरे देणार तर २०१० नंतरच्या झोपड्यांना अपात्र ठरवून पुन्हा बेघर होण्याची वेळ येईल. तसे होऊ नये यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व बांधवांना आश्वासित केल्याप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजना सोबत महाराष्ट्र शासन व पालिका मिळून पुनर्वसन योजना आखणी केली आहे. आणि त्याचबरोबरीने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सर्वेक्षणाचे काम देखील सुरु आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्वसामान्य माणसाची जाण आहे त्यामुळे त्यांनी या विषयी झोपड्पट्टीवासीयांसोबत बैठका घेऊन त्यांच्या सूचनाही ऐकून घेत त्या संदर्भात कार्यवाहीसाठी आयुक्त मंगेश चितळे यांच्यासोबत बैठक घेतली. आणि पुढील कार्यवाहीला वेग दिला आहे.  त्यामुळे घरांच्या संदर्भात दिशाभूल करण्यापासून झोपडपट्टी वासियांनी सावध रहावे, असे आवाहन करतानाच झोपडपट्टी पुनर्वसनसाठी आमदार प्रशांत ठाकूर अग्रेसर असून त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवावा आणि सर्वांनी आपल्या हक्कासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत रहावे, असेही आवाहन पत्रकार शंकर वायदंडे यांनी केले.