खारघरमध्ये तिथीनुसार शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
खारघर/प्रतिनिधी दि.२०-शिवसैना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा सेक्टर-८ खारघर आणि श्री साई विघ्नहर्ता मित्र मंडळ तसेच विरमाता जिजाऊ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती काल सोमवार दिनांक १७ मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळी ९-०० वाजता शिवप्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले.दुपारी २-०० वाजता सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. सायंकाळी ६-३० ते ७-०० या वेळेत बाळ शिवाजी पाळणा व महाराजांची आरती करण्यात आली.त्याचवेळी महिला भगिनींचा हळदी-कुंकू समारंभ संपन्न झाला. सायंकाळी ७-०० ते १०-०० या वेळेत साई स्वर नृत्त्योत्सव या लाईव्ह ऑर्केस्ट्रा संस्थेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले.त्याचबरोबर खारघरमधील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
शिवजयंती उत्सवासाठी सेक्टर-८,१० आणि २ मधील अबालवृद्ध,महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने दिवसभर येऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन करीत होते.
संपूर्ण खारघरमधील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते तसेच विविध सोसायट्यांचे पदाधिकारी कार्यक्रमस्थळी येऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन करीत होते त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी आमदार सन्माननीय बाळाराम पाटील,पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे देवेंद्र मढवी,माजी सरपंच देवेंद्र पाटील,अजीत अडसुळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पनवेल महानगर प्रमुख सौ.लीना अर्जुन गरड यांचा समावेश आहे.
खारघर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आप्पासाहेब मगर यांनी सुद्धा छत्रपती शिवरायांना अभिवादन केले.शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने या सोहळ्यात साई भंडारा आयोजित करून उपस्थितांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला.
मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी सन्माननीय रामचंद्र देवरे यांनी जनसभाजवळ आपले मनोगत व्यक्त केले.