सीकेटी महाविद्यालयात मुलींची आंतर-विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धा संपन्न

सीकेटी महाविद्यालयात मुलींची आंतर-विभागीय  सॉफ्टबॉल स्पर्धा संपन्न



पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स कॉलेज (स्वायत्तआणि मुंबई विद्यापीठ यांच्या समन्वयाने मुलींची ‘आंतर विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धा’ शनिवार दिनांक ८ मार्च  २०२५ रोजी आयोजित करण्यात आली होती.

     या आंतर-विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धेचे उद्‌घाटन चांगु काना ठाकूर आर्टस्कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेजचे प्राचार्य मा. प्रो. डॉ. एस.के.पाटील यांनी केलेया स्पर्धेमध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे इत्यादी  विभागांनी सहभाग नोंदविला होता. त्याचबरोबर स्पर्धेतील सहभागी विभागांचे संघ-व्यवस्थापक व  प्रशिक्षक  यांनी  उपस्थिती  दर्शविली. तसेच स्पर्धेमध्ये वरील ३ विभागातील, मुलींच्या ३ संघानी  सहभाग नोंदविला होता. मुलींच्या आंतर-विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मुंबई उपनगर विभाग, द्वितीय क्रमांक ठाणे विभाग व तृतीय क्रमांक मुंबई शहर विभाग यांनी पटकवला. सी.के.टी. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांनी विजेत्या संघांना पारितोषिके देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिमखाना विभागाचे चेअरमन डॉ. व्ही. बी. नाईकसहसंचालक प्रा. अनिल नाक्ती व प्रा. प्रतिज्ञा पाटीलजिमखाना विभागाचे सर्व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.