दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षम झाला पाहिजे हि आमची तळमळ - लोकनेते रामशेठ ठाकूर

दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षम झाला पाहिजे हि आमची तळमळ - लोकनेते रामशेठ ठाकूर 


लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न 

पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. १२) मोठ्या उत्साहात पार पडला.  
     या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय स्पर्धा, विद्यापीठ स्पर्धा, महाविद्यालयीन स्पर्धा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून यशस्वी झालेला विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.  सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी  दातृत्व,  कर्तुत्व आणि मातृत्व या तीनही गोष्टींचा संगम असणारे व्यक्तिमत्व आणि मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा,  महाविद्यालय विकास समितीचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर हे होते. यावेळी त्यांनी  विद्यापीठ व आंतरराष्ट्रीय  स्पर्धेत, महाविद्यालयीन स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून या महाविद्यालयासाठी काहीही कमी पडणार नाही याची  दक्षता आम्ही घेऊ असे ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी महाविद्यालयाच्या विकासासाठी आणखी वीस लाख रुपये देणगी जाहीर केली. गेल्या ४० वर्षात या ठिकाणी शिक्षणासाठी खूप अडचणी होत्या पण त्या या महाविद्यालयाच्या अनुषंगाने गेल्या दोन वर्षात भरून निघाल्या असल्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अधोरेखित केले. आजचे युग स्पर्धेचे आहे आणि या स्पर्धेत तळागाळीत दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षमपणे सामोरे जायला पाहिजे, ही आमची तळमळ असते त्यामुळे आपल्याकडून जेवढे करता येईल तेवढी मदत झाली पाहिजे हा उद्दिष्ट ठेवून मार्गक्रमण करत असल्याचे त्यांनी नमूद केले. या ठिकाणी गुणवंत प्राप्त विद्यार्थ्यांना मिळालेली बक्षिसांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे निश्चितच या महाविद्यालयाने शिक्षणासह इतर क्षेत्रातही वेगाने विकास केला असल्याचे गौरवोद्गारही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काढले. 
                 व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे  यांनी सामाजिक आणि शैक्षणिक विकासामध्ये आपली संस्था ही महत्त्वाचे कार्य करीत आहे. म्हणून पारंपरिक शिक्षणाबरोबरच आपण  तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण घेणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर बदलत्या काळाबरोबर आपण बदललो पाहिजे ते मानवजातीच्या  विकासासाठी महत्त्वाचे आहे. असेही ते यावेळी म्हणाले. कुठल्याही परिस्थितीत खचून न जाता जिद्द ठेवून चिकाटीने अभ्यास करीत रहा. नक्कीच तुम्ही ठरवलेल्या  ध्येयापर्यंत पोहोचणार, असा सल्लाही शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिला. पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. या सोहळ्याची सुरुवात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य   डॉ. ए. एन चांदोरे यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षातील उल्लेखनीय  कार्य व विविध उपक्रमांची  माहिती दिली. महाविद्यालयातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल या वर्षीचा 'लोकनेते रामशेठ ठाकूर पुरस्कार' सीनियर प्रा. एस. ई. सैंदनशिव तर महाविद्यालयातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल या वर्षीचा 'ॲड.भगीरथ शिंदे पुरस्कार' ज्युनिअर प्रा. एस. ए. फुंदे यांना प्रदान करण्यात आला.  
          या सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन  व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय.  टी. देशमुख, महाविद्यालय विकास समिती सदस्य कुणाल लाडे, महाविद्यालयाचे उपप्रचार्य  प्रा. एस. ई. सैंदशिव, उपप्राचार्य डॉ. एस. जी. मेंगाळ, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. व्ही. एम. मोरे,  जिमखाना विभाग प्रमुख डॉ. एस. एच. जाधव, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. एल.  डी. भोर, रयत शिक्षण  या संस्थेच्या आश्रम शाळेचे प्रकल्प अधिकारी काकूळते सर, शेळके सर, काजळे सर, लंके सर, वाघमारे सर, हनीफ शेख, संदीप निकम, काशिनाथ कान्हव, फारुख पिंजारी, प्रशांत पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.  

Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image