रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा क्रीडा मेळा उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

 

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा क्रीडा मेळा उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती




पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा पहिला वार्षिक क्रीडा मेळा रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झाला.
क्रीडा मेळ्याचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक अमोघ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकावून करण्यात आले. त्यानंतर मशाल प्रज्वलन व शपथविधी सोहळा झाला. 
      या वेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, अध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव डॉ. एस.टी. गडदे, माजी पं.स. सदस्य रत्नप्रभा घरत, आरटीपीएस स्कूलचे चेअरमन भार्गव ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, शालेय समिती सदस्य जयवंत देशमुख, वसंत पाटील, विश्वनाथ कोळी, दर्शन ठाकूर, अर्चना ठाकूर, मीनाक्षी पाटील, राधा ठाकूर तसेच डायरेक्टर प्राचार्य राज अलोनी, एमएनएम विद्यालय व टीएनजी ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य प्रणिता गोळे आदी उपस्थित होते. क्रीडा मेळ्यादरम्यान विद्यार्थ्यांनी कराटे, पिरॅमिड्स, प्री-प्रायमरी मास ड्रिल आणि मार्च पास्ट सादर केले. बेस्ट हाऊस ट्रॉफी ग्रीन हाऊसने पटकाविली. पालकांची शर्यतही रंगली. मुख्याध्यापिका चश्मिंदर बक्षी यांनी मान्यवरांसह पालकांचे आभार मानले व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.