सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला




मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक अडथळे दूर करत काही महिन्यातच पूर्णत्वास येणार आहे. गुरुवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा  महामार्गाचा पाहणी दौरा केला. पनवेल तालुक्यातील पळस्पे फाटा येथून महामार्गाच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली दरम्यान राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे पहिल्यांदाच पनवेल तालुक्यात आले होते. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, दीपक बेहेरे, खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, पंचायत समिती माजी सदस्य भूपेंद्र पाटील, प्रीतम म्हात्रे रुपेश नागवेकर,अमरीष मोकल, केळवणे विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, साई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विद्याधर मोकल, किसान मोर्चाचे अतुल बडगुजर यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते .पनवेल ते हातखंबा रत्नागिरी असा हा पाहणी दौरा होता. यासंदर्भात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.