इनरव्हील क्लब पनवेलचा यशस्वी मेगा प्रोजेक्ट

 इनरव्हील क्लब पनवेलचा यशस्वी मेगा प्रोजेक्ट



पनवेल (प्रतिनिधी) नऊ ते पंधरा वर्षे या वयोगटातील मुलींसाठी निरोगी आरोग्याच्या दृष्टीने सी.पी.ए.ए.यांच्या माध्यमातून इनरव्हील क्लब पनवेल तर्फे अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविण्यात आला. 
इनरव्हीलच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर शोभना पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चार डॉक्टर्स आणि सहा नर्सेस च्या टीमने पनवेल परिसरातील आगरी संस्थेची शाळा,  तसेच दिघोडे आणि पारगाव या शाळेतील जवळजवळ २५० विद्यार्थिनींना सर्वाइकल कॅन्सर व्हॅक्सिनेशन देण्यात आले.  याप्रसंगी मुलींचे पालकही उपस्थित होते .
          व्हॅक्सिनेशन देण्यापूर्वी सर्व विद्यार्थिनींच्या पालकांना क्लब प्रेसिडेंट डॉक्टर विणा यांनी या कॅन्सर व्हॅक्सिनेशन विषयी जागरूक करणारी व्याख्याने प्रत्येक शाळेत दिली होती. त्यामुळे पालकांनी या प्रकल्पाला भरभरून प्रतिसाद दिला. या नंतर मुलींना खाऊचे वाटप करण्यात आले. खांदा कॉलनी येथील आगरी समाज संस्थेच्या शाळेचे प्रिन्सिपल पंकज भगत आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा तांडेल यांनी याप्रसंगी इनरव्हील क्लबला जागा उपलब्ध करण्यापासून सर्वतोपरी मदत करून विद्यार्थिनींच्या आरोग्याप्रती जागरूकता दर्शविली. याप्रसंगी आगरी शाळेचा संपूर्ण महिला स्टाफ तसेच क्लब प्रेसिडेंट डॉक्टर विणा मनोहर, क्लबच्या इतर सदस्यांच्या अथक परिश्रमातून हा प्रकल्प यशस्वी झाला.