करंजाडे येथील मुकरीची वाडी आदिवासीवाडीतील सभा मंडपाचे शेकाप खजिनदार प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते लोकार्पण
पनवेल ः करंजाडे वसाहतीतील दुर्लक्षित असलेल्या मुकरीची आदिवासी वाडी येथे रहिवाशी यांच्या मागणीनुसार माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या प्रयत्नने लोकांच्या मनातील आमदार प्रितम म्हात्रे यांच्या वतीने जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या निधीतून सभा मंडपाचे बांधकाम केले आहे. त्याचे लोकार्पण शेकापचे जिल्हा खजिनदार व करंजाडेकरांच्या मनातील आमदार प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवारी लोकार्पण करण्यात आले.
करंजाडे वसाहतीमध्ये समस्यांचे डोगर कायम आहे. यातच स्थानिक लोकप्रतिनिधीचे दुर्लक्षित असलेल्या मुकरीची वाडी या आदिवासी वाडीमध्ये अनेक समस्या आहेत. यामध्ये येथील आदिवासी महिला व बांधवाना कार्यक्रम असल्यावर हक्काचं शेड मंडप नसल्यामुळे अनेक कार्यक्रमादरम्यान गैरसोय होत होती. यावेळी येथील स्थानिकांनी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्याकडे सभा मंडपाची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार आंग्रे यांनी लोकांच्या मनातील आमदार प्रितम म्हात्रे यांना विषय सांगतच म्हात्रे यांनी होकार दर्शवीत जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या निधीतून सभामंडपाचे बांधकाम केले. यावेळी प्रितम म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवारी सभा मंडपाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी तेथील महिलांनी अनेक समस्याचा पाढा वाचला. त्यावेळी लोकांच्या मनातील आमदार असलेले प्रितम म्हात्रे यांनी तुमच्या समस्या सिडको दरबारी मांडून पाठपुरावा करू असे आश्वासन यावेळी म्हात्रे यांनी दिला. यावेळी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
आमच्या महिलांची अनेक महिन्यापासून सभा मंडपाची मागणी होती. यावेळी आमची उन्हाळा, पावसाळ्यात दसरा उत्सवात होणारी गैरसोय यामुळे दूर होणार आहे. सभामंडपाचे लोकार्पण झाल्यामुळे येथील ग्रामस्थ, महिला यांनी शेकापचे खजिनदार प्रितम म्हात्रे व माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांचे आभार व्यक्त केले आहे. यावेळी शेकाप कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते तसेच आदिवासी महिला व बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.