५० टक्के सवलतीच्या दरात एलईडी टीव्ही आणि रेंजर सायकल; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ

 ५० टक्के सवलतीच्या दरात एलईडी टीव्ही आणि रेंजर सायकल; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ 




पनवेल (प्रतिनिधी) लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, सुहास भगत, सुदर्शन घरत व संदीप म्हात्रे यांच्या संयोजनातून नागरिकांना दिनांक ८ ते २५ जानेवारीपर्यंत स्मार्ट एलईडी टिव्ही आणि रेंजर सायकल ५० टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. या उपक्रमाचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उलवा नोड येथे शुभारंभ करण्यात आला. 
         या कार्यक्रमास भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत, रतन भगत, वामन म्हात्रे, हेमंत ठाकूर, अंकुश ठाकूर, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, निलेश खारकर, रमेश घरत, भाऊशेठ भोईर, मदन पाटील, सुधीर ठाकूर, किशोर पाटील, व्ही. के. ठाकूर, सी.एल. ठाकूर, मीनाक्षी पाटील, योगिता भगत, सुजाता पाटील,  राजेंद्र देशमुख, रवींद्र भोईर, नवनाथ जाधव, सागरकुमार रंधवे, श्रीधर मोकल, राम मोकल, अनिल गमरे, अरविंद काटकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
         उलवा नोड सेक्टर १७ मधील भारतीय जनता पार्टी कार्यालयात हि सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासाठी आधारकार्ड आणि रेशनकार्ड अनिवार्य आहे. तंत्रज्ञानाच्या युगात इलेक्ट्रॉनिक्स उपकरण जीवनाचा भाग झाला आहे. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, कलर टीव्ही, एलसीडी त्यानंतर अधिक स्पष्टतेसाठी एलईडी असे तंत्रज्ञान बदल घडत गेले. त्याचप्रमाणे शरीर आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सायकलचा वापर वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर या वस्तू नागरिकांना कमी दरात मिळाव्यात, यासाठी ५० टक्के सवलत हि योजना राबवली आहे. त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले असून ८३०८४६६४४८ किंवा ९५५२४६८३८८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी कळविले आहे. 

Popular posts
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image