शिक्षण क्षेत्रात विज्ञानाकडून
तंत्रज्ञानाकडे वाटचाल-कर्मवीर भाऊराव पाटील
विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ.
ज्ञानदेव म्हस्के
पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचा (स्वायत्त) वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि दर्पण २०२४-२५ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. ज्ञानदेव म्हस्के, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची विशेष उपस्थिती लाभली.
यावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे , पनवेल महानगरपालिकेच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अनिल भगत, संजय भगत, प्रकाश भगत, एम. पी. ए. एस. सी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर आदी मान्यवरांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती या सोहळ्याला लाभली. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे डॉ. रत्नप्रभा म्हात्रे संपादित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवनपटावरआधारित“जिज्ञासा” या २७ व्या लघुअंकाचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमामध्ये एन.सी.सी. च्या पथकाने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. या सोहळ्याची सुरुवात सुरेल राज्य गीताने झाली. त्यानंतर प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. तसेच प्रमुख पाहुण्यांची ओळख इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. आर. व्ही. येवले यांनी करून दिली. यानंतर प्राचार्यांनी आपल्या भाषणामध्ये महाविद्यालयातील गौरवशाली परंपरांचा आढावा घेतला.
त्यानंतर महाविद्यालयातील क्रीडा, कला, संशोधन , सेवा क्षेत्रातील ज्या विद्यार्थ्यांनी विभागीय, विद्यापीठीय , राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर दैदिप्यमान यश प्राप्त केले अशा विद्यार्थ्यांचा आणि महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला.तसेचमहाविद्यालयातीलशैक्षणि
या कार्यक्रमामध्ये प्रो. डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी आपल्या भाषणात महाविद्यालयाला नॅक तर्फे A++मुल्यांकन प्राप्त झाल्याबद्दल प्राचार्य, विद्यार्थी, शिक्षक, यांचे भरभरून अभिनंदन केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना उदेशून सांगितले कि “मानव अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि ज्ञानाकडून विज्ञानाकडे आणि आत्ता विज्ञानाकडून तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत आहे म्हणून या तंत्रज्ञानाअंतर्गत शिक्षकांनी एआय प्रणाली चा वापर शैक्षणिक क्षेत्रात केला पाहिजे”, असे आपल्या मार्गदर्शक भाषणातून सांगितले.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना विविध क्षेत्रात अशीच प्रगती करा आणि महाविद्यालयाचे नाववृद्धींगत करा आणि माजी विद्यार्थी झाले तरी महाविद्यालयाची आठवण ठेवा असे संबोधिले.या सोहळ्याचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. गीतिका तंवर यांनी केले. प्रा. डॉ.आर.व्ही.येवले, प्रा. ए. व्ही. पाटील आणि प्रा. डॉ. गीतिका तंवर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
दुसऱ्या सत्रात दर्पण २०२४-२५ या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी मनोरंजक व भाषण तज्ञ आणि लेखक संजीवन म्हात्रे यांची अतिथी म्हणून विशेष उपस्थिती लाभली.त्याचबरोबर प्राचार्य प्रो.डॉ. एस. के. पाटील, कलाशाखेचे प्रमुख प्रो.डॉ. बी. एस. पाटील, वाणिज्य शाखेचे प्रमुख प्रो.डॉ.एस.बी.यादव, विज्ञानशाखेच्या प्रमुख डॉ.जे.एस.ठाकूर आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाचे समन्वयक प्रो. डॉ. बी. डी. आघाव, रुसा समन्वयक डॉ. एस. एन.वाजेकर आदी मान्यवर उपस्थित होते. संजीवन म्हात्रे यांनी आपल्या भाषणात मोबाईलचा वापर सुयोग्य करायचा कि अयोग्य करायचा हे आपल्या हातात आहे, असे विद्यार्थ्यांना उद्देशुन सांगितले तसेच त्यांनी स्टँडअप कॉमेडी प्रदर्शित केली. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे समन्वयक गणेश जगताप, सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख डॉ. गीतिका तंवर आणि विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थी कल्याण विभागाच्या समन्वयक डॉ.मंदा म्हात्रे व इतर सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.