दि.बा.पाटील साहेबांच्या जयंती निमित्त महाआरोग्य शिबिर, नामांकित डॉक्टरांकडून विविध आजारांचे निदान होणार एकाच ठिकाणी"

 दि.बा.पाटील साहेबांच्या जयंती निमित्त महाआरोग्य शिबिर, नामांकित डॉक्टरांकडून विविध आजारांचे निदान होणार एकाच ठिकाणी" 



पनवेल : महाराष्ट्रात विविध प्रकारे असणाऱ्या रोगांचे निदान होत आहे परंतु योग्य वेळी योग्य सल्ला न मिळाल्यामुळे सदर रोगाचे प्रमाण वाढवून त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात. या अनुषंगानेच स्वर्गीय लोकनेते दि बा पाटील साहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून शेकाप नेते रायगड जिल्हा खजिनदार श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 जासई येथील रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा येथे केले आहे.
             या शिबिरामध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी अपोलो हॉस्पिटल, मेडीकव्हर हॉस्पिटल, न्यु ईरा हॉस्पिटल, सुश्रुषा हॉस्पिटल  यांचे तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि  इंडियन मेडिकल असोसिएशन पनवेल यांच्या सौजन्याने मोफत औषध रुग्णांना देण्यात येणार आहे. सदर महाआरोग्य शिबिरात पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिसनर्स असोसिएशन  यांच्या 40 पेक्षा जास्त तज्ञ डॉक्टरांचे पथक उपस्थित राहून रुग्णांना सेवा देणार आहेत. दीपक क्लीनिकल लॅबोरेटरीचे संचालक श्री.दीपक कुदळे यांच्या माध्यमातून स्त्रियांसाठी मोफत थायरॉईड चेकअपची सेवा देण्यात येणार आहे.  
             आर जे. शंकरा आय हॉस्पिटल  यांच्या माध्यमातून मोफत डोळे तपासणी करून आवश्यक असल्यास योग्य ती शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. शस्त्रक्रिये दरम्यान प्रवासाची संपूर्ण व्यवस्था सुद्धा रुग्णांना  करून देण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये आवश्यकती रक्ततपासणी, जनरल बॉडी चेकअप आणि तज्ज्ञांचा मोफत सल्ला देण्यात येईल. अशाप्रकारे माहिती आयोजक शेतकरी कामगार पक्ष, पनवेल/उरण व जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.


क्रिकेट सामन्यांचे प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : उलवे नोड प्रिमियर लिग यांच्या वतीने मर्यादित षटकांचे साखळी क्रिकेट सामन्यांच्या ६ व्या पर्वाचे आयोजन गावदेवी मैदान न्हावा येथे करण्यात आले आहे.
       सामन्यांचे उद्घाटन शेकाप नेते रायगड जिल्हा खजिनदार श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागात क्रिकेटचे सामने मोठ्या प्रमाणात खेळवले जातात यातूनच भविष्यात आपल्या विभागातून तरुण पिढी नक्कीच निर्माण होईल. उत्तम दर्जाचे आयोजन आज येथे येणाऱ्या सर्व क्रीडा प्रेमींना या सामन्यादरम्यान पाहता येईल याची मला खात्री असल्याचे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. उलवे नोड प्रीमियर लीगच्या सर्व सभासदांना तसेच आपला खेळण्यासाठी आलेल्या सर्व टीमला यावेळी शुभेच्छा दिल्या.
      यावेळी श्री. जितेंद्र म्हात्रे, श्री. सचिन घरत, श्री. रोशन म्हात्रे, श्री. विजय घरत, श्री. किशोर पाटील, श्री. उत्तम कोळी, श्री. दीपक तांडेल,  श्री. मयूर म्हात्रे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image