आठवडा बाजारामध्ये सापडलेला सॅमसंगचा महागडा मोबाईल केला सुपूर्द ; आदिवासी समाजातील तरुणाचा प्रामाणिकपणा

आठवडा बाजारामध्ये सापडलेला सॅमसंगचा महागडा मोबाईल केला सुपूर्द ; आदिवासी समाजातील तरुणाचा प्रामाणिकपणा

पनवेल/सुनिल वारगडा :

नेरे गावाजवळ दर शनिवारी आठवडा बाजार भरत असतो. या आठवडा बाजारामध्ये कमी दरात वस्तू आणि भाजीपाला मिळत असल्याने या शनिवारच्या आठवडा बाजारामध्ये जवळपास राहणाऱ्या परिसरातील लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. विशेष म्हणजे वाजे, गाढेश्वर, धोदानी, मालडुंगे विभागातील आदिवासी समाजातील लोक रानमेवा व स्वतः लागवड केलेल्या भाजीपाल्याची विक्री येथील महिलावर्ग या बाजारामध्ये करत असतात. कमी दरात दैनंदिनी वस्तू आणि भाजीपाला मिळत असल्याने ग्रामीण भागाप्रमाणे  सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांची देखील गर्दी पाहायला मिळत असते.

      या नेरे आठवडा बाजारात

 शनिवार (दि. ०४ जाने.) रोजी मोठी गर्दी असल्याने तिथे महागडा सॅमसंग कंपनीचा मोबाईल एका महिलेचा पडला असता तो मोबाईल मालडुंगे येथे राहणाऱ्या ग्रामपंचयात सदस्या उषा गणपत वारगडा व आशा रमेश भगत या सख्या दोन बहिणींना तो मोबाईल सापडला. मात्र सापडलेल्या मोबाईला पासवर्ड असल्याने तो मोबाईल कोणाचा आहे याची खात्री लवकर पटली नाही. म्हणून तो मोबाईल त्या दोघींनी पत्रकार गणपत वारगडा यांच्याकडे दिला. 

       मात्र, थोड्या टाईमाने त्या मोबाईलवर कॉल आला आणि त्या व्यक्तीने माझा मोबाईल आहे असे सांगितल्यावर मी मोबाईल घेऊन येतोय, नाही तर तुम्ही मोबाईल घेयाला या असे त्वरित गणपत वारगडा यांनी सांगितले. तेव्हा कोप्रोली अरिहंत सोसायटीमध्ये राहणाऱ्या कुटुंबांनी मालडुंगे  येथे येण्यास लागले असता त्यांना गाढेश्वर येथेच रात्र झाली. तसेच या परिसरात नव्याने असल्याने आणि रात्र झाल्याने त्यांना मालडुंगे येथे येण्यास भिती वाटत होती. म्हणून त्यांनी गणपत वारगडा यांना पुन्हा कॉल केला आणि गाढेश्वर पर्यंत येण्याची विनंती केली. मोबाईल मला भेटला म्हणून  "तुम्ही या मी नाही येणार, असे विचार न करता" गणपत वारगडा लगेच गाढेश्वर कँटिंग येथे जाऊन मिळालेला मोबाईल त्यांच्या स्पुर्त केला.

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image