२०२५ आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते संपन्न

२०२५ आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते संपन्न


पनवेल/ प्रतिनीधी :

२०२५ आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (१ जाने.) रोजी करण्यात आले. 

गणपत वारगडा हे आदिवसी सम्राटचे संपादक असून ते वेळोवेळी त्यांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आदिवासींचे प्रश्न सातत्याने शासन दरबारी मांडत असतात. एवढंच नाही तर गणपत वारगडा हे सामाजिक कार्यकर्ते असून ते आदिवासी संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या आदिवासी सेवा संघाच्या वतीने समाजात प्रबोधन करत असतांना अनेकांना न्याय देखील देत असतात, असे दिनदर्शिकेचे प्रकाशन करतावेळी लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.

 यावेळी जेष्ठ नेते श्री. वाय.टी. देशमुख, जेष्ठ पत्रकार अनिल भोळे, पत्रकार शंकर वायदंडे, रवींद्र गायकवाड, अनिल कुरघोडे, आदिवासी सेवा संघाचे सचिव सुनील वारगडा, आशिष साबळे आदि. उपस्थित होते.

Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image