रामकी कंपनी संरक्षण भिंत कोसळली; आमदार प्रशांत ठाकूर यांची घटनास्थळी पाहणी; गावकऱ्यांसोबत समिती नेमण्याची सूचना
पनवेल (प्रतिनिधी) रामकी कंपनी भोवती बांधण्यात आलेली संरक्षण भिंत गुरुवारी कोसळली. सुरक्षा भिंतीवर लिचडचा भार येऊ नये, याची काळजी घेणे गरजचे असूनही निष्काळजीमुळे ही भिंत कोसळ्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे. दरम्यान यासंदर्भात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आणि या अनुषंगाने योग्य उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेता गावकऱ्यांसोबत एक समिती नेमावी अशी सूचना त्यांनी केली. या नुसार येत्या सोमवार किंवा मंगळवारी पनवेल महापालिका, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळासोबत बैठक होणार आहे.