माजी सरपंच हरिश्चंद्र पाटील व अनुसया पाटील यांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रमे
पनवेल (प्रतिनिधी) कोळखे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कै. हरिश्चंद्र पाटील यांची ३१ वी तर त्यांच्या पत्नी कै. अनुसया पाटील यांचा १७ वी पुण्यतिथी कार्यक्रम १२ डिसेंबर रोजी होणार असून त्या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमे आयोजित करण्यात आली आहे.
कोळखे गावातील आई बंगलो येथे सकाळी ११ वाजता गायिका संध्या घाडगे यांचे स्वरांजली कार्यक्रम, दुपारी १२ वाजता प्रतिमेचे पूजन, सायंकाळी ४ वाजता जय हनुमान महिला हरिपाठ मंडळ कोळखे यांचे हरिपाठ, सायंकाळी ६ वाजता भजनसम्राट बाळासाहेब वाईकर(नगर) आणि भजनसम्राट जगन्नाथ वाडेकर (पंढरपूर) यांची चक्रीभजन जुगलबंदी होणार आहे. त्यानंतर रात्री ९ वाजता जय हनुमान प्रासादिक वारकरी भजन मंडळ पालीखुर्द आणि रात्री ११ वाजता श्री हनुमान प्रासादिक वारकरी भजन मंडळ कसलखंड यांचे डबल बारी वारकरी आणि अभंग- गोंधळ होणार आहे. या कार्यक्रमाचा नागिरकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकाश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक आजिवली विद्यालय समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, बाबुराव पाटील, विश्वनाथ पाटील व कुटुंबीयांनी केले आहे.