भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली

पनवेल (प्रतिनिधी ) भारत घडवणारे  भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, भारतरत्न माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांची १०० वी जयंती आज (दि. २५) पनवेल तालुका  शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह इतर पदाधिकारी  कार्यकर्त्यांनी अटलजींच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.       

           यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिवादन केल्यानंतर आदरांजली वाहताना म्हंटले कि, आपला देश आपले लाडके माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांची १०० वी जयंती अर्थात सुशासन दिवस साजरा करत आहे. उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे मुत्सद्दी राजकारणी म्हणून ते आजही अगणित लोकांना प्रेरणा देत आहेत. त्यांनी आधुनिक भारताची उभारणी करण्याचे स्वप्न पाहिले होते. देशातील सर्वांना विशेषत: गरीब आणि वंचित घटकांना केंद्रबिंदू मानून त्यांनी काम केले.  त्याच वेळी त्यांच्या सरकारने अनेक आर्थिक सुधारणा करून भारताच्या आर्थिक उत्थानाचा पाया रचला.  त्याच मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा काम करत आहेत. अटलजींनी आपल्या जीवन प्रवासात समृद्ध साहित्यकृतींच्या निर्माता असलेल्या या लेखक आणि कवी मनाच्या व्यक्तिमत्त्वाने आपल्या लेखनात शब्दांचा वापर हा प्रेरणा देण्यासाठी, विचार करायला प्रवृत्त करण्यासाठी केला. ते सर्व वयोगटातील लोकांच्या मनात घर करून राहिले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वातून शिकता आले आहे. आपल्या देशाच्या क्षमतेवर असलेला अटलजींचा अढळ विश्वास आपल्या सर्वांना उच्च ध्येय आणि कठोर परिश्रम करण्यासाठी सतत प्रेरणा देत आहे, असेही त्यांनी नमूद करत आदरांजली वाहिली. 

        यावेळी भाजपचे शहर सरचिटणीस अमित ओझे, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव,  माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर, कामगारनेते जितेंद्र घरत, युवा मोर्चाचे दिनेश खानावकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, अशोक साळुंखे, महेश पाटील, राम म्हात्रे, महेंद्र म्हात्रे, काळुराम फडके, नवनाथ पाटील, आकाश फडके, सुदेश फडके, विजय पाटील, किशोर चौतमोल, आकाश यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली 

पनवेल (प्रतिनिधी ) भारत घडवणारे व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, भारतरत्न माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांची १०० वी जयंती आज (दि. २५) पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अटलजींच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.       