उरणातील सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांचा प्रीतम म्हात्रे यांना जाहीर पाठींबा

 उरणातील सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांचा प्रीतम म्हात्रे यांना जाहीर पाठींबा


उरण :  उरणातील सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी प्रीतम जे एम म्हात्रे यांना जाहीर पाठींबा दिला आहे. 

      आगामी उरण विधान सभा निवडणुकीत उरण मतदारसंघातील गावा गावातील मुलभूत समस्या रस्ते, पाणीटंचाई, स्वच्छता, आरोग्य तसेच बेरोजगारी, उरण मधील सुसज्ज १०० खाटांचे रुग्णालय, विद्यार्थ्यांना इंजीनियरिंग, मेडिकल कॉलेज तसेच उच्च शिक्षणा ची व्यवस्था उरण मध्ये नसल्यामुळे नवी मुंबई, मुंबई मध्ये जाण्यास किमान दोन तासाचा प्रवास करावा लागत आहे. उरण रेल्वे सुरु झाली तरी स्थानिकांना या रेल्वे प्रकल्पात नोकऱ्या मिळालेल्या नाहीत त्याच प्रमाणे आगामी काळात उरण मतदारसंघात उभारण्यात येत असलेल्या  लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर असणाऱ्या नोकरीत स्थानिक प्रकल्पग्रस्त तरुणांना समाविष्ट करण्याचा विषय, तसेच करंजा रेवस सागरीसेतू मध्ये नोकरीत आणि व्यावसायिक संधी या सर्व गोष्टींचा विचार करता हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे तरुण तडफदार उमेदवार त्यांचे मित्र प्रितम जे एम म्हात्रे यांना सचिन डाऊर यांनी जाहीर पाठींबा दिला आहे. आणि सर्व तरुणांनी आणि नागरिकांनी त्यांच्या पाठीशी राहून त्यांची निशाणी “शिट्टीचा बुलंद” आवाज उरणच्या विधानसभा मतदार संघामधून राज्याच्या विधानसभे पर्यंत पोचवा व त्यांना भरघोस मताने विजयी करा असे आवाहन सचिन डाऊर यांनी मतदारांना केले आहे.

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image