डोनेशनसाठी सर्वसामान्याची लुटमार करणाऱ्या मुजोर शैक्षणिक संस्थाना शेकापचा दणका दाखवू -युवा नेते प्रितमदादा म्हाञे

 डोनेशनसाठी सर्वसामान्याची लुटमार करणाऱ्या मुजोर शैक्षणिक संस्थाना शेकापचा दणका दाखवू -युवा नेते प्रितमदादा म्हाञे


उरण : शासनाच्या आरटई धोरणानुसार 9 वी पर्यतचे शिक्षण मोफत दिले जाते माञ येथिल मुजोर शिक्षण संस्था चालक पालकाना वेठीस धरून डोनेशनच्या नावाखाली सर्वसामान्याची लुटमार करीत आहेत. या गोरगरीब जनतेची लुटमार थांबविण्यासाठी शेकाप अशा शिक्षणसम्राटाना आपला हिसका दाखविल्या शिवाय राहणार नाही असा गंभीर इशारा युवा नेते प्रितम म्हाञे यानी उलवे येथै बोलताना दिला.

    उलवे येथे प्रितम म्हाञे यानी उलवे से.8 9 च्या रहिवाशाच्या गाठी भेटी घेतल्या. त्यावेळी रहिवाशाशी संवाद साधताना ते बोलत होते. कार्यक्रमासाठी राकेश घरत, जितेंद्र म्हाञे, सचीन ताडफले उपस्थित होते. यावेळी सोसायट्याना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी या निवडणूकीत आपल्याला संधी देण्याची विनंती त्यानी केली. यावेळी बोलताना शेकापचे डॅशिग नेते सचीन ताडफळे म्हणाले की पारिजातक आपल्या दारी माञ फुले पडतात शेजार्याच्या घरी अशी आपली अवस्था झाली आहे. या सर्व गोष्टीचा निकाल लावण्यासाठी कार्यकुशल नेतृत्व प्रितमदादा म्हाञे हेच एकमेव औषध आहे. जनसामान्याचे हे प्रश्न जर ताकदीने सोडवायचे असतील तर रिटायर्ड विरोधी उमेदवाराना घरी पाठवून उद्याचा उगवता सुर्य प्रितमदादा म्हाञे याना निवडून दिले पाहिजे. येत्या 20 तारखेला मतदार हे काम चोख बजावतील अशी अपेक्षाही त्यानी यावेळी व्यक्त केली.

Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image