दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेचा लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा

 दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेचा  लोकप्रिय  आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा 


पनवेल (प्रतिनिधी) भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी आणि मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना दिवसेंदिवस विविध संस्था संघटनांचा वाढता पाठिंबा मिळत असून या विधानसभा निवडणुकीसाठी दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. 

         या संदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे पाठिंबा पत्र सुपूर्द करण्यात आले असून पाठिंबा पत्रात म्हंटले आहे कि, आमच्या संघटनेची झालेल्या सर्वसाधारण बैठकीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाने सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी पनवेल विधानसभा मतदार संघाचे भाजप महायुतीचे आमदार कार्यक्षम तसेच कार्यसम्राट उमेदवार म्हणून बिनशर्त व सक्रीय पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यामुळे दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेचा प्रत्येक दिव्यांग सदस्य, त्यांचे कुटुंबीय, निराधार तसेच इतर सर्व सदस्य, पदाधिकारी वर्ग आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे. आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर हे अत्यंत दानशूर व उदार तसेच समाजातील गोरगरीब व दिव्यांग तसेच विद्यार्थी व गुणवंत, गरजवंत अशा सर्वांना मदतीचा हात नेहमीच पुढे करणारे लोकनेते आहेत. आणि त्यांचा सामाजिक बांधिलकीचा वारसा त्यांचे चिरंजीव आमदार प्रशांत ठाकूर चालवत आहेत.  सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रदिर्घ अशी यशस्वी व जनहिताची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राजकारण व समाजकारण यांचा अनुभव घेत व अभ्यास करीत विधानसभा निवडणुकीत आमदार पदावर यशस्वी गरूड झेप घेवून पनवेल मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे एक कर्तव्य दक्ष व जनहिताची कामे करण्यात मग्न राहणारा आमदार आम्हाला लाभला हे या मतदारसंघाचे सुदैव आहे. अत्यंत दांडगा जनसंपर्क व सर्वसामान्य जनतेविषयीची सहानुभूती यामुळे आता सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सुध्दा आपण फार मोठ्या मताधिक्याने विजयी होणारच याविषयी आम्हा सर्वांना खात्री आहे. नेतृत्व गुण व समाजसेवी व्यक्ती म्हणून या मतदारसंघातील सुजाण जनता आपणास बहूसंखेने विजयी करणार हे निश्चित असून आमच्या दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेतर्फे पाठिंबा देत आहोत, असेही या पाठिंबा पत्रात म्हंटले आहे. 


Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image