मतदारांचा विश्वास सार्थ ठरवू, प्रितमदादा म्हाञे

 मतदारांचा विश्वास सार्थ ठरवू, प्रितमदादा म्हाञे


उरण : उरण विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदाराच्या नाकर्तेपणामुळे तालुक्याचा विकास रखडला असून या तालुक्याला पुन्हा विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मतदाराचा विश्वास सार्थ ठरवू असे प्रतिपादन प्रितम जे एम म्हाञे यानी केले. विधानसभा निवडणूक प्रचारार्थ पागोटे येथे प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी बंडाशेठ, जितेंद्र म्हात्रे, रमाकांत म्हाञे, शिपाजी काळे, महेश साळुंखे आदि उपस्थित होते.
    यावेळी बोलताना प्रितमदादा म्हात्रे म्हणाले की पागोटे क्रातीवीरांची भुमी आहे, माञ या भुमीतील नागरीकाना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. तालुक्याचे आमदार यांचे या समस्याकडे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या पाच वर्षात ते इकडे फिरकले देखील नाहीत. यानंतर आता निवडणुक समोर दिसताच त्यानी थापा मारण्यास सुरूवात केली आहे. ते रस्त्याबद्दल बोलत नाहीत, पाण्या बद्दल बोलत नाहीत. येथील आगरी, कोळी समाजाच्या समस्याबद्दल बोलत नाहीत तर अटल सेतू बद्दल बोलतात. आगरी, कोळी, समाजाचा अवमान होईल असे बोलत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत शिट्टी या चिन्हापुढील बटण दाबून मला विजयी करावे असे आवाहन प्रितम म्हात्रे यांनी केले आहे. 
Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image