महेश बालदी यांनी आगरी समाजाबद्दल अवमानकारक शब्द वापरल्याप्रकरणी 12 नोव्हेंबरला समाजाच्या मोर्चाचे आयोजन
पनवेल : उरण विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टी तर्फे निवडणूक लढवीणारे उमेदवार महेश रतनलाल बालदी हे आगरी समाजाबद्दल वारंवार अवमानकारक शब्दप्रयोग करत असतात. मागील विधानसभा निवडणूक काळातही बालदी यांनी आगरी समाजातील महिलांबद्दल अनुद्गार काढले होते. महेश बालदी यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि त्यांनी आगरी समाजाची जाहीर माफी मागावी या मागणीसाठी आगरी समाजातर्फे दि. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता उरण पोलीस स्टेशन येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.