स्त्री भृण हत्या थांबविण्याची जबाबदारी प्रत्येक नवी मुंबईकराची
नवी मुंबई- केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात गर्भधारणापूर्व व प्रसुतिपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम 2003 व सुधारित नियम 2014 (PCPNDT Act) ची अंमलबाजावणी करण्यात येते. सदर कायदयाची अंमजबजावणी, पर्यवेक्षण, व नियंत्रण प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीने शासनामार्फत आरोग्य विभामध्ये वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांना समुचित प्राधिकारी म्हणुन नियुक्त केले आहे.
सदर कायदयाअंतर्गत सोनोग्राफी सेंटर, कौन्सीलींग सेंटर, जेनेटिक लॅबोरेटरी, जेनेटीक क्लिनिक,सी.टी.स्कॅन,एम.आर.आय. व पेट सीटी स्कॅन इत्यादी सुविधांची नोंदणी करण्यात येते. सद्यस्थितीत नमुंमपा कार्यक्षेत्रात एकूण 185 पीसीपीएनडिटी नोंदणीकृत सेंटर्स कार्यरत आहेत. सदर सेंटर्सची वैद्यकीय अधिकारी ना.प्रा.आ. केंद्र यांच्या मार्फत नियमित त्रैमासिक तपासणी व एफ फॉर्म ऑडीट करण्यात येते.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये सदर कायदयाची अधिक प्रभावीपणे अंमलबाजावणी होण्याकरीता मा. आयुक्त श्री. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली असुन नवीन सेंटर्स मार्फत https://app.nmmconline.in/ या वेबसाईटवर अर्ज प्राप्त होत आहेत.
यासोबत केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सरोगसी (नियमन) कायदा 2021 व सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (नियमन) (Assisted Reproductive Technology) कायदा 2021 ची अंमलबजावणी करण्यात येते. सदर कायदयाअंर्तगत ए.आर.टी. क्लिीनीक लेवल -1, लेवल-2, ए.आर.टी. बॅन्क व सरोगसी इत्यादी सेंटर्संना राज्य शासनाच्या मान्यतेनंतर नोंदणी देण्यात येते.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लिंग गुणोत्तर प्रमाण यामध्ये समतोल रहावा याकरीता नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये अवैध गर्भपात व छुप्या मार्गाने गर्भलिंग निदान होत असल्याचे निदर्शनास आल्यास http://amchimulgimaha.in या संकेतस्थळावर किंवा 18002334475 टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी. माहिती देणा-या खबरी व्यक्तीच्या नावाची गुप्तता राखली जाईल व (शासन अटी व शर्तीनुसार) रोख रुपये 1,00,000/- (एक लाख मात्र ) गुन्हा सिध्द झाल्यानंतर बक्षीस माहिती देणा-यास देण्यात येईल.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लिंग गुणोत्तर प्रमाण राखण्याकरीता व स्त्री भृण हत्या रोखण्याकरीता प्रत्येक नागरीकाने सतर्क राहुन खबर देण्याचे आवाहन नमुंमपा आयुक्त मा.श्री.कैलास शिंदे यांनी केले आहे.