कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या युनियनचे २६ कामगार व पदाधिकारी मोरोक्को साठी रवाना!

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या युनियनचे २६ कामगार व पदाधिकारी मोरोक्को साठी रवाना!



उरण दि ११(विठ्ठल ममताबादे )इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन (ITF) लंडन या बहूराष्ट्रीय संघाचे अधिवेशन दर चार वर्षांनी होत असते. मागील अधिवेशन सिंगापूर येथे झाले होते त्यावेळी न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे तब्बल ५० कामगार व पदाधिकारी या अधिवेशनास गेले होते.यावर्षी १३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर रोजी मोरोक्को (आफ्रीकन देश ) येथे हे अधिवेशन भरविण्यात येणार आहे. या अधिवेशनासाठी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या संघटनेचे तब्बल २६ कामगार व पदाधिकारी दिनांक ११ ऑक्टोबर रोजी मोरोक्को साठी रवाना झाले. आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत असतांना माझ्या कामगारालाही बाहेरच जग फिरता आले पाहिजे त्याला परदेशातील कामगारांच्या समस्या, मागण्या कळल्या पाहिजेत या उद्देशाने कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे या कामगारांना परदेशातील अधिवेशणासाठी घेऊन जात आहेत. असा विचार करणारे महेंद्रशेठ घरत हे एकमेव कामगार नेते आहेत.या सर्वांना विमानात बसण्याची संधी मिळतेय व परदेश पाहण्यासाठी सर्व उत्सुक असल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
Popular posts
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image