कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या पूर्वसंधेला कामगारांना पगारवाढ

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या पूर्वसंधेला कामगारांना पगारवाढ



उरण दि ६(विठ्ठल ममताबादे )
न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या मध्यस्थिने श्री. गुरुदेव शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस (हिंदुस्तान यार्ड धुतुम) या एम टी यार्ड मधील कामगारांना ६००० रुपये पगारवाढ देण्याचा करार करण्यात आला. त्याचबरोबर या करारनाम्यानुसार कामगारांना एक ग्रॉस सॅलरी बोनस व इतर सोईसुविधा देण्याचे मान्य करण्यात आले. हा पगारवाढीचा करार कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या शेलघर येथील कार्यालयात करण्यात आला.या प्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष पी. के. रमण, सरचिटणीस  वैभव पाटील उपस्थित होते तर व्यवस्थापनातर्फे  जितेंद्र सिंग (डायरेक्टर),  देवेंद्र सिंग (डायरेक्टर) तसेच कामगार प्रतिनिधी  अरुण ठाकूर, करण ठाकूर, आतिश ठाकूर, सुनील ठाकूर, अक्षय ठाकूर, समीर ठाकूर, मंगेश ठाकूर, आदी उपस्थित होते. गणपती सणापूर्वी कामगारांना पगारवाढ मिळाली असल्यामुळे तसेच एक ग्रॉस सॅलरी बोनस व इतर सोईसुविधा देण्याचे मान्य करण्यात आल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image