उरणच्या आदित्य घरत ने मिळवले गोल्ड मेडल;"पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी हरियाणा येथे करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व"

उरणच्या आदित्य घरत ने मिळवले गोल्ड मेडल;"पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी हरियाणा येथे करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व"


पनवेल  :     आज महाराष्ट्रातील तरुण पिढी विविध क्षेत्रात आपले प्राविण्य मिळवत आहे. यामध्ये रायगड मधील तरुण सुद्धा पाठी नाहीत. महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धा चेंबूर येथे ऑगस्टमध्ये झाली होती यामध्ये महाराष्ट्रातील अनेक पॉवरलिफ्टर सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये आदित्य अनंत घरत याने  गोल्ड मेडल पटकावले. 13 सप्टेंबर 2024  रोजी हरियाणा येथे नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आदित्यला मिळाली आहे. 

     आदित्यने केलेल्या या  उत्कृष्ट कामगिरीबद्दल शेतकरी कामगार पक्षातर्फे पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मा.आमदार श्री.बाळाराम पाटील, मा.नगराध्यक्ष श्री जे.एम. म्हात्रे, कृ.उ.बा.स. सभापती श्री.नारायणशेठ घरत, पनवेल पं.स.सभापती श्री.काशिनाथ पाटील,शेकाप महाराष्ट्र राज्य खजिनदार श्री.अतुल म्हात्रे, शेकाप रा.जि. खजिनदार श्री.प्रितम ज.म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस श्री.गणेश कडू आणि शेकाप महिला आघाडी  यांनी सन्मान करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Popular posts
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image