सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली चे अध्यक्ष वसंतराव ओसवाल यांचे दुःखद निधन
पनवेल दिनांक ४ (विजयकुमार जंगम): - सुधागड एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वसंत गणेशमल ओसवाल यांचे वयाच्या ८२ व्यां वर्षी पुणे येथे उपचार सुरू असताना बुधवारी दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात मुलगा,दोन मुली, सुन,नातवंडे,जावई,भाऊ असा परिवार आहे. समाज, सांस्कृतिक, राजकीय,शैक्षणिक, क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावून आपला कार्याचा ठसा त्यांनी गेली पाच दशके समाजमनावर बिंबवला आहे. त्यांच्या आकस्मित दुःखद निधनाने सुधागड एज्युकेशन सोसायटीचा संपूर्ण परिवारावर तसेच सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील हजारो हितचिंतकांवर शोककळा पसरली आहे .त्यांचे मृतदेहावर उद्या दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी पाली येथील स्मशानभूमीत सकाळी साडे अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.