कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांना लोकमत लोकनेता सन्मान पुरस्कार

 कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांना लोकमत लोकनेता सन्मान पुरस्कार 



उरण दि २७(विठ्ठल ममताबादे )
रायगड व नवीमुंबईतील राजकीय नेत्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी तसेच नेत्यांचे कार्य समाजापुढे आणण्यासाठी लोकमत समूहाने लोकमत लोकनेता सन्मान पुरस्कार सोहळा गुरुवारी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे आयोजित केलेला होता.

     दानशूर व डॅशिंग नेते महेंद्रशेठ घरत यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन लोकमत लोकनेता सन्मान पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी मागील ३७ वर्ष समाजासाठी तन -मन -धनाने काम करत असतांना हजारो तरुणांना नोकरी, कामगारांना न्याय, सर्व गावांमध्ये विकासाची कामे, १५ रुग्णवाहीका, शेकडो मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आर्थिक मदत, घरे बांधण्यासाठी मदत,अशा प्रकारे समाजातील प्रत्येक घटकासाठी केलेल्या सर्वांगीण विकासाच्या कामाची दखल घेऊन लोकमत लोकनेता सन्मान पुरस्कार देऊन त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मनसे नेते माजी आमदार नांदगावकर, नितीन सरदेसाई, लोकमत मिडिया ग्रुपचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, उपाध्यक्ष विजय शुक्ला, संपादक अतुल कुलकर्णी, आदी मान्यवर उपस्थित होते.