धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा अणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा अणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ


*सभासद नोंदणीसाठी ऑटोरिक्षा परवाना धारकांनी संपर्क करा*

    *-सहायक उपप्रादेशिक अधिकारी अजित ताम्हणकर*

*रत्नागिरी, दि.१० (जिमाका) : धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा अणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळामध्ये सभासद नोंदणीबाबतचे कामकाज उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व ऑटोरिक्षा परवाना धारक, ऑटोरिक्षा / मीटर टॅक्स चालकांनी याची नोंद घेऊन महामंडळामध्ये नोंदणी करण्याकरिता उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी केले आहे.*

    धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा अणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्यास शासनामार्फत मान्यता देण्यात आली असून मंडळाच्या कार्यपध्दती / कामकाजाबाबतची नियमावली निर्गमित करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार मंडळाच्या जिल्हास्तरीय कार्यालयासाठी संबंधित परिवहन विभागामार्फत आवश्यक त्या मनुष्यबळासह पार पाडावयाचे असलेबाबत निश्चित करण्यात आले आहे.