रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी सु.ए.सो.चे के.आ.बांठीया विद्यालय नवीन पनवेलचे प्राचार्य श्री.बी.एस.माळी यांची निवड

रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी सु.ए.सो.चे के.आ.बांठीया विद्यालय नवीन पनवेलचे प्राचार्य श्री.बी.एस.माळी यांची निवड  


पनवेल(प्रतिनिधी)-आज रविवार दिनांक 25/ 8/ 2024 रोजी रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची सर्वसाधारण सभा सु.ए.सो.चे के.आ.बांठीया विद्यालय नवीन पनवेल येथे दुपारी 12:30 वाजता संघाचे अध्यक्ष श्री.नितीन गोरीवले सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सभेत शैक्षणिक वर्ष 2024 ते 2026 साठी पदाधिकाऱ्यांची निवड लोकशाही पद्धतीने करण्यात आली.या सभेत रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून सर्वानुमते जिल्ह्यातील ज्येष्ठ प्राचार्य व धडाडीचे कार्यकर्ते की,ज्यांचे योगदान या संघाला मोठ्या प्रमाणात असते असे सन्माननीय श्री.बी.एस.माळी सर यांची निवड करण्यात आली.माळी सरांच्या निवडीमुळे जिल्ह्यातून त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव झाला.तसेच या निवडीबद्दल जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी समाधान व्यक्त केले व या आठवड्यात जिल्ह्याची नवीन कार्यकारणी व संचालक मंडळ जिल्हाध्यक्ष श्री.बी.एस.माळी सर यांच्या नेतृत्वाखाली संघाचे सर्व जेष्ठ मार्गदर्शक यांच्या उपस्थितीत जाहीर होऊन जिल्हा अध्यक्ष यांची टीम लगेचच कार्यरत होईल व रायगड जिल्ह्यातील प्रश्न तडीस नेण्यास ही संघटना कार्यरत राहील असे नूतन अध्यक्षांनी आश्वासित केले.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image