पंचशील नगर झोपडपट्टी पुनर्वसन करण्याबाबत. आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन

पंचशील नगर झोपडपट्टी पुनर्वसन करण्याबाबत. आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन 


पनवेल प्रतिनिधी :- पंचशील नगर येथील झोपडपट्ट्यांचे सुनियोजित जागेत पुनर्वसन करण्याची मागणी पंचशील नगर रहिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे,संस्थेचे सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार निलेश सोनावणे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे केली आहे.

      पंचशील नगर हे अनेक वर्षापासून वसलेले गोरगरीब दलितांची वसाहत असून  त्या ठिकाणी नियोजित रेल्वेचे जंक्शन आराखडा असल्याची चर्चा असून जंक्शन झाल्यास येथील वर्षानुवर्ष वास्तव्यास असलेल्या नागरिकांना बेघर होण्याची वेळ येऊ नये याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांना या झोपड्यांचे सुनियोजित जागेत पुनर्वसन लवकरात लवकर करावे अशी मागणी पंचशील सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली.

    पनवेल रेल्वे जंक्शन चे काम  वेगात सुरू असून चाळीस वर्षापासून वसलेल्या झोपड्यां असलेल्या भूखंडावर रेल्वेचा नियोजित आराखडा असल्याचे समजते  पंचशील नगर झोपडपट्टी व नवनाथ नगर झोपडपट्टी असलेल्या भूखंडावर रेल्वे च्या विस्तारित आराखड्यामध्ये   पंचशील नगरचेच्या ६०८ झोपड्या व नवनाथ नगरच्या सुमारे ३५० झोपड्यात राहणाऱ्या ४० वर्षापासून वास्तव्यास असणाऱ्या ४ हजार नागरिकांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते ते बेघर होऊ शकतात , या दृष्टिकोनातून या झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्याचे निवेदन यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांना देण्यात आले.  याबाबत महानगरपालिकेची तात्काळ बैठक लावून चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन  आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले.

       यावेळी पंचशील नगर रहिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे उपाध्यक्ष ,अशोक आखाडे संघटक कैलास नेमाडे ,खजिनदार भानुदास वाघमारे संस्थेचे सल्लागार  तथा ज्येष्ठ पत्रकार निलेश सोनावणे ज्येष्ठ पत्रकार संजय कदम ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी उपस्थित होते.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image