शेकापतर्फे उरण मध्ये दहीहंडीचे आयोजन,"पोलिसांच्या कार्याला दिली गोविंदांनी सलामी"
पनवेल : महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उरण मध्ये पारंपारिक पद्धतीने दहीहंडी साजरा करण्याची गावोगावी पद्धत आहे. शेतकरी कामगार पक्षातर्फे आज उरण मध्ये शेकापचे रायगड जि. खजिनदार श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या संकल्पनेतून भव्य "दहीहंडी-2024" चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाच, सहा आणि सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. पिरकोन येथील वाघेश्वर गोविंदा पथकाने गेला काही दिवसांमध्ये पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल उरण पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चार थराची सलामी देऊन उपस्थित सर्व पोलीस अधिकारी वर्गाला सन्मान दिला.