आशियाई जलतरण स्पर्धेत कर्नाळा स्पोर्ट्स अॕकॅडेमीची जलतरणपटू कु.सारा अभिजीत वर्तक हीची उल्लेखनीय कामगिरी

आशियाई जलतरण स्पर्धेत कर्नाळा स्पोर्ट्स अॕकॅडेमीची जलतरणपटू कु.सारा अभिजीत वर्तक हीची उल्लेखनीय कामगिरी 


पनवेल(प्रतिनिधी)-१४ राष्ट्रांच्या ६०० जलतरूणपटूंनी भाग घेतलेल्या या स्पर्धेत भारताला २१ पदके मीळाली असून कर्नाळा स्पोर्ट्स अॕकॅडेमीमधील सर्वात लहान जलतरणपटू कु.सारा अभिजीत वर्तक हिने बँकॉक येथे झालेल्या आशियायाई शालेय जलतरण स्पर्धेत  वयोगट 6  मध्ये भारतामधून महाराष्ट्र जलतरण संघाचे प्रतनिधीत्व करून  3 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली.संपूर्ण क्रिडा विश्वातून आणि नवी मुंबई परिसरातील मान्यवरांकडून कुमारी सारा हिच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कु.सारा हीला प्रशिक्षक समर्थ नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.