पत्रकार संघटनेने राबवलेला समाजाभिमुख उपक्रम- डॉ. गिरीश गुणे

 पत्रकार संघटनेने राबवलेला समाजाभिमुख उपक्रम- डॉ. गिरीश गुणे


पनवेल- नवी मुंबई प्रिंट आणि डिजिटल पत्रकार संघातर्फे  गरीब, गरजूना 33 सायकलचे वाटप

 पनवेल : पनवेल- नवी मुंबई प्रिंट आणि डिजिटल पत्रकार संघातर्फे पनवेल परिसरातील गरीब-गरजू, विद्यार्थी आणि नागरिकांना 33 सायकलचे वाटप 15 ऑगस्ट रोजी करण्यात आले. यावेळी अनेकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. यावेळी  प्रीतम म्हात्रे माजी विरोधी पक्ष नेते, रामदास शेवाळे जिल्हाप्रमुख, सईद मुल्ला माजी नगराध्यक्ष, प्रथमेश सोमण शिवसेना महानगर प्रमुख पनवेल, डॉ. गिरीश गुणे, मंगेश परुळेकर ओरियन मॉल मालक, हर्षला तांबोळी उद्योजिका, मुख्य वितरक सदाशिव बिराजदार, ऍड.मनोहर सचदेव, गोरखनाथ पोळ, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मयूर तांबडे, उपाध्यक्ष समीर वेश्र्वीकर, सचिव दीपक घरत, दीपक जगे, अशोक गोरडे, रमेश भोळे, दीपक कांबळे, मिलिंद खारपाटील, पंकज तांबडे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
         विविध पक्षातून असे उपक्रम केले जातात मात्र पत्रकार संघातर्फे सायकल वाटप कार्यक्रम घेणे ही कौतुकाची बाब असल्याचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. कोणताही कार्यक्रम करताना अडचणी येतात आणि जो काम करतो त्यालाच अडचणी येतात. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीकरता ३३ सायकल दिलीत ही सोपी गोष्ट नाही. हे काम खूप मोठे असल्याचे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. पत्रकारांनी राबवलेला हा समाजाभिमुख उपक्रम असल्याचे डॉक्टर गिरीश गुणे यांनी सांगितले. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो त्या अंतर्गत हा स्तुत्य उपक्रम राबवला, याबद्दल त्यांनी पत्रकार संघटनेचे कौतुक केले. पत्रकारांच्या बातमीपेक्षा सायकल वाटप हा वेगळा अँगल असून हा अनेकांना समाधान देणारा कार्यक्रम आहे असे मत व्यक्त केले. 
           सायकल मिळाली, त्याचा सदुपयोग करा आणि चांगले शिक्षण घ्या असे ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर यांनी सांगून त्यांनी पत्रकार संघटनेचे कौतुक केले. पत्रकार जेव्हा सक्रिय भूमिकेत उतरतात तेव्हा असे कार्यक्रम घेतले जातात असे माजी नगरसेवक प्रथमेश सोमण यांनी सांगितले. लहान मुलांना सायकलचं आकर्षण असतं आणि त्या वयात त्यांना सायकल मिळणे हे महत्त्वाचे आहे. पत्रकार संघटनेने सायकल वाटप केले त्या सायकलची चाके त्यांच्या वेगाला गती देत नाही तर त्याच्या शिक्षणाला गती देत असल्याचे सांगत ते या मुलांच्या भविष्याला देखील गती देणार असल्याचे सोमण यांनी सांगितले. माजी नगराध्यक्ष, समाजसेवक सईद मुल्ला यांनी पत्रकार संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक करत या सायकलचा उपयोग शिक्षणासाठी करा असा विद्यार्थ्यांना सल्ला दिला. उद्योजिका हर्षला तांबोळी यांनी पनवेल- नवी मुंबई प्रिंट आणि डिजिटल पत्रकार संघातर्फे वाटप करण्यात आलेल्या सायकल वाटप कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image