खारकोपर आणि बामणडोंगरी रेल्वे स्थानकात शौचालय सुरू;"शेकाप नेते प्रितम म्हात्रेंचा यशस्वी पाठपुरावा"
पनवेल : गेल्या वर्षभरापासून सिडको आणि रेल्वे प्रशासन यांच्यात बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्टेशन येथील सुविधां संदर्भात फक्त पत्र व्यवहार होत होता. पाण्याची व्यवस्था सुरळीत नसल्यामुळे तेथील शौचालये बंद आहेत. त्याचा त्रास रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागत होता. हा विषय शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि पनवेल महानगरपालिकेचे मा.विरोधी पक्षनेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांना आम्ही उलवेकर मित्र मंडळ आणि रेल्वे प्रवाशांनी सांगितला त्यासोबतच इतर समस्या सुद्धा त्यांच्यासमोर मांडल्या होत्या.