मा.नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी प्रभागातील अनियमित व अपुरा पाणीपुरवठा निवेदनाद्वारे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या निदर्शनास आणून दीला

मा.नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी प्रभागातील अनियमित व अपुरा पाणीपुरवठा निवेदनाद्वारे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या निदर्शनास आणून दीला



खारघर(प्रतिनिधी)- पनवेल महानगरपालिकेच्या मा नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी खारघर शहरातील त्यांच्या प्रभाग क्रमांक ४ सेक्टर ११,१३,१४,१९,२० व २१ या ठिकाणी अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा कमी दाबाने तसेच अनियमित होत आहे. या संदर्भात श्री राहुल सरोदे सहाय्यक अभियंता पाणीपुरवठा विभाग, खारघर तसेच श्री. गायकवाड कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग रायगड भवन यांना देखील वेळोवेळी लेखी पत्राद्वारे तसेच फोनद्वारे कळविलेले आहे. परंतु आजच्या तारखेपर्यंत पाणीपुरवठ्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही. सेक्टर २१ येथील काही सोसायटी ज्यांचे प्लॉट नंबर व नावे कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा यांना लेखी निवेदनाद्वारे देखील दिलेले आहेत. त्यात देखील कुठल्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही. सेक्टर १९ मधील पाणीपुरवठा देखील कमी दाबाने व अनियमित होत आहे सदर बाब देखील वेळोवेळी श्री राहुल सरोदे, सहाय्यक अभियंता पाणीपुरवठा विभाग खारघर यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. यात कुठलीही ठोस कार्यवाही ही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने होताना दिसून येत नाही. ज्या सोसायटींना कमी पाणीपुरवठा होतो त्यांना सिडको मार्फत टँकर पुरवण्यात येतात परंतु बऱ्याच सोसायटीच्या ह्या देखील तक्रारी आहेत की टँकरची मागणी करून देखील त्यांना चार चार दिवस टँकरचे पाणी मिळत नाही संबंधित अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर आमच्यावर कामाचा ताण आहे आम्ही काय करू? अशा प्रकारचे उत्तर सर्वसामान्य नागरिकांना दिले जात आहेत. 

          काही सेक्टरमध्ये अनेक सोसायट्यांनी बूस्टर पंप लावून अनधिकृतपणे पाण्याची चोरी केली जात आहे व त्यामुळे त्या सोसायटीच्या आजूबाजूच्या सोसायट्यांना अतिशय कमी प्रमाणात पाणीपुरवठा होतो अथवा काही ठिकाणी होतच नाही. सदर बाब देखील संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे तरी देखील कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. सर्वसामान्य नागरिकांचे तर अधिकारी फोन देखील उचलत नाहीत तसेच लोकप्रतिनिधींचे फोन देखील ते उचलत नाहीत. आलेला फोन बघून परत त्यांना साधे उत्तर देण्याचे सुद्धा सौजन्य दाखवत नाहीत अशा कामचुकार अधिकाऱ्यांवर तात्काळ त्या विभागातून बदली अथवा निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी सर्व नागरिकांची मागणी आहे.

      या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्या भेटीची तारीख व वेळ कळवावी जेणेकरून आमचे सर्व सहकारी नगरसेवक तसेच प्रभागातील  रहिवाशांना पूर्व सूचना देऊन त्यांना देखील आपल्या सोबत होणाऱ्या बैठकीत सहभागी करून घेता येईल.अशी विनंती सौ.नेत्रा किरण पाटील यांनी आपल्या निवेदनाद्वारे केली आहे.