चिरफाड न करता बदलली ७४ वर्षीय महिलेच्या ऱ्हदयाची झडप

चिरफाड न करता बदलली ७४ वर्षीय महिलेच्या ऱ्हदयाची झडप 

मेडिकवर हॉस्पिटल्समध्ये यशस्वी उपचार- ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट (टीएव्हीआर) प्रक्रियेचा केला वापर


नवी मुंबई:खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटल्स येथील वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. अनुप महाजनी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एका ७४ वर्षीय महिलेवर चिरफाड न करता तिच्या ऱ्हदयाची झडप बदलली. आता रुग्णाची प्रकृती स्थिरावली असून तिने दैनंदिन कामांनीही पुन्हा सुरूवात केली आहे.

        मुंबईत वास्तव्यास असलेल्या रुग्ण सौ लक्ष्मी तांडेल(७४) यांना गेल्या कित्येक दिवसापासून श्वासोच्छवास घेण्यात अडचणी, छातीत दुखणे, ताप आणि चक्कर येणे अशा तक्रारी सातवत होत्या. जूनमध्ये रुग्णाला हृदयविकाराच्या उपचारासाठी मेडिकोवर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णाला मूत्रमार्गासंबंधीत गंभीर संक्रमण आढळून आले होते ज्यामुळे रक्तदाब कमी झाला होता (सेप्टिक शॉक) आणि मल्टीपल ॲार्गन फेल्युअर (यकृत आणि मूत्रपिंडांसह) ची समस्या दिसून आली. तिची प्रकृती अत्यंत गंभीर झाल्याने नातेवाईक चिंतातूर झाल. रक्तप्रवाहात गंभीर जिवाणू संसर्ग, हृदय, मूत्रपिंड आणि यकृत निकामी झाल्यामुळे आणि आयव्ही औषधे आवश्यकता होती मात्र यातूनही तिला वाचविण्याची शक्यता फारच कमी होती,असे मेडिकवर हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ अनुप महाजनी यांनी स्पष्ट केले.

        डॉ महाजनी पुढे सांगतात की, या महिलेला लो फ्लो लो ग्रेडियंट सीव्हियर ऑर्टिक स्टेनोसिस (महाधमनी वाल्व पूर्णपणे उघडण्यास असमर्थता) असल्याचे निदान झाले आणि त्यामुळे मुख्य अवयवांसह शरीराला रक्तपुरवठा प्रतिबंधित झाला. महाधमनीची झडप ही तुमच्या हृदयातील चार मुख्य झडपांपैकी एक आहे. हृदयाचे ठोके वाढताना त्याची उघडझाप होते,ज्यामुळे हृदयातून रक्त शरीरातील उर्वरित भागात वाहते. जसजसे वय वाढत जाते, तसतसे या झडपांवर कॅल्शियम जमा होऊ शकते, ज्यामुळे ते घट्ट होतात. परिणामी, महाधमनीची झडप नीट उघडू शकत नाही, ज्यामुळे हृदयाला अरुंद झडपातून रक्त पंप करण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतात. याला महाधमनी स्टेनोसिस (व्हॅल्व्ह्युलर स्टेनोसिस) म्हणतात. महाधमनी स्टेनोसिसमुळे श्वास लागणे, छातीत दुखणे, थकवा आणि चक्कर येणे अशा समस्या उद्भवतात. तावी (TAVI) प्रक्रिया तुमचा व्हॅाल्व दुरुस्त करण्यात मदत करते. या रुग्णाला सीव्हियर ऑर्टिक व्हॉल्व्ह रेगर्गिटेशन (त्याच झडपाची बंद होण्यास असमर्थता आणि त्यामुळे रक्त गळती होऊ शकते) असे देखील होते. त्याच व्हॉल्व्युलर आजारामुळे हृदयाचे पंपिंग खूप कमी होते. याचा परिणाम म्हणून, योग्य वैद्यकीय उपचार करुनही या महिलेला श्वास घेता येत नव्हता आणि तिचा रक्तदाब नियंत्रणात राखता येत नव्हता ज्यामुळे तिला मूत्रपिंडाचा आजार झाला होता. डायलिसिस न करता आणि फक्त संसर्गावर नियंत्रण ठेवत तिच्या यकृत आणि मूत्रपिंडाच्या आजारावरही उपचार करण्यात आले. 

        एक आठवड्याच्या उपचारानंतर, रुग्णाचे यकृत आणि मूत्रपिंड निकामी होण्यापासून वाचविणे शक्य झाले. मात्र हार्ट फेल्युअरची शक्यता नाकारता येत नव्हती. हार्ट फेल्युअरची लक्षणे म्हणजे श्वासोच्छ्वास घेण्यात अडचणी, पायांवर सूज येणे, ओटीपोटात रक्तसंचय आणि चेहऱ्यावर सूज येणे आणि छातीत दुखणे यांचा समावेश आहे. कोरोनरी धमनी रोग आणि अशा रूग्णांना महाधमनी बदलण्याची शस्त्रक्रिया आवश्यक आहे (हृदयाच्या कमी पंपिंगमुळे आणि मूत्रपिंडाच्या गंभीर आजारामुळे शस्त्रक्रिया अधिक आव्हानात्मक होती) असे डॉ महाजनी यांनी स्पष्ट केले.

         व्हॉल्व्ह बदलण्यासाठी सहसा स्टर्नोटॉमीसह ओपन-हार्ट प्रक्रियेची आवश्यकता असते. मात्र या रुग्णावर ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट (टीएव्हीआर) प्रक्रियेचा वापर करण्यात आला. हृदयाचे पंपिंग कमी होणे, कमी रक्तदाब, अनियमित आणि वाढलेले हृदय गती आणि सतत हार्ट फेल्युअर यासारख्या गुंतागुंताीमुळे ओपन हार्ट सर्जरीऐवजी टिएव्हीआर अधिक प्रभावी ठरते. 

        जेव्हा महाधमनी व्हॉल्व्हमध्ये समस्या उद्भवते आणि रुग्णाला ओपन हार्ट सर्जरीचा धोका असतो तेव्हा टिएव्हीआर प्रक्रियेचा वापर केला जातो. ही प्रक्रिया अतिशय लहान छिद्र पाडून केली जाते ज्यामुळे छातीच्या हाडांना इजा होत नाही. एखाद्या व्यक्तीचा टिएव्हीआर प्रक्रियेचा  पुनर्प्राप्तीच्या बाबतीत अनुभव हा कोरोनरी अँजिओग्रामसारखा असू शकतो. टिएव्हीआर प्रक्रिया दोन पध्दतींपैकी एक वापरून केली जाते, ज्यामुळे हृदयरोगतज्ज्ञ किंवा शल्यचिकित्सक व्हॉल्व्हमध्ये प्रवेश करण्याचा सर्वोत्तम आणि सुरक्षित मार्ग कोणता आहे हे निवडू शकतात. ट्रान्सफेमोरल म्हणजेच फेमोरल धमनी (मांडीतील मोठी धमनी) मधून प्रवेश करत छातीत शस्त्रक्रियेची आवश्यकता भासत नाही. ट्रान्सपिकल पध्दतीमध्ये छातीत एक लहान छिद्र पाडून आणि छातीतील मोठ्या धमनीतून किंवा डाव्या वेंट्रिकलच्या टोकातून (शिखर) प्रवेश करून मिनीमली इनव्हेसिव्ह शस्त्रक्रिया केली जाते. सर्जिकल व्हॉल्व्ह बदलण्याच्या तुलनेत टिएव्हीआर प्रक्रियेनंतर रुग्णाचा हॉस्पिटलमधील कालावधी देखील कमी होतो असे डॉ महाजनी यांनी स्पष्ट केले. 

          डॉ महाजनी पुढे सांगतात की, टिएव्हीआर प्रक्रियेच वापर केल्याने रुग्ण दुसऱ्याच दिवशी बरा झाला आणि कोणत्याही लक्षणांशिवाय रुग्णाला अवघ्या 2 दिवसांत घरी सोडण्यात आले आणि रुग्णाचा रक्तदाब देखील सामान्य झाला आहे. रुग्णाची प्रकृती आता बरी आहे तसेच रुग्ण लक्षणांपासून मुक्त आहे आणि कोणत्याही त्रासाशिवाय दैनंदिन कामांना सुरुवात केली आहे. रुग्णाला अँटीकोग्युलेशनची  (उच्च-कार्यक्षमतेने रक्त पातळ करणे) गरज भासणार नाही. रुग्णावर योग्य वेळी उपचार न केल्यास त्यांना एनजाइना (छातीत दुखणे), सिंकोप (पडणे) कमी आयुर्मानासह बेशुध्द पडणे (syncope) आणि दम लागणे (dyspnea) तसेच आयुर्मान कमी होणे यासारख्या गुंतागुंतीचा सामना करावा लागला असता. मेडीकवर हॉस्पिटल्स हे अत्याधुनिक सुविधा, कुशल तज्ज्ञ, प्रगत तंत्रज्ञान तसेच आधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज आहे. रूग्णांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांची चोवीस तास काळजी घेत उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा याठिकाणी पुरविल्या जातात.

         जेव्हा रुग्णाला घरी सोडण्यात आले तेव्हा तिला स्वतःच्या पायावर चालताना पाहून नातेवाईकांना आणि रुग्णाला अतिशय आनंद झाला. त्यांनी डॉ. महाजनी आणि मेडिकोवर हॉस्पिटलमधील टीमला त्यांनी विशेष आभार मानले. डॉ. महाजनी आणि त्यांच्या टीमच्या प्रयत्नांमुळे मला नवे आयुष्य मिळाल्याची प्रतिक्रिया रुग्णाने व्यक्त केली.

Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image