खारघर मधील सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये "जागरूक नवी मुंबई अभियान संपन्न"
खारघर (प्रतिनिधी)- खारघर मधील सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये जागरूक नवी मुंबई अभियान संपन्न झाले. या मार्गदर्शन व जनजागृती अभियान कार्यक्रमांमध्ये बेलापूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. विशाल माने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरोशे सर उपस्थित होते डॉ.विशाल माने सरांनी सायबर सुरक्षा व गुन्हे प्रतिबंध ,व्यसनमुक्ती व अमली पदार्थ प्रतिबंध ,आर्थिक फसवणूक व प्रतिबंध व उपाय , रस्ते सुरक्षा व अपघात प्रतिबंध या विविध विषयावर उपस्थित विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना मार्गदर्शन केले .वाढती सायबर गुन्ह्यातील फसवणुकीची संख्या पाहता आपण सायबर गुन्ह्यात फसणार नाही याविषयी सविस्तर माहिती दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी आर सुरोशे सरांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त महाराष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येकाने व्यसनमुक्तीची शपथ घ्यावी असे आवाहन केले.