कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
उरण (प्रतिनिधी)- रायगड जिल्हा काँग्रेस कमेटीचे डॕशींग अध्यक्ष आणि दानशूर नेते महेंद्रशेठ घरत यांचा वाढदिवस हजारो हितचिंतक कार्यकर्ते,मित्र,नातेवाईक आणि आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शेलघर या त्यांच्या गावी साजरा झाला.
संपूर्ण रायगड जिल्ह्यातून त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव झाला.शेलघर येथील समाज मंदीराच्या भव्य प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.उपस्थितांच्या मनोरंजनासाठी लाईव्ह आॕर्केस्ट्राचे सदाबहार संगीत गायनाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था सुद्धा केली होती.
पारा ४० अंशावर असताना सुद्धा हजारो हितचिंतक महेंद्रशेठना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दीवसभर येत होते.