कोंकण भवनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतनिमित्त अभिवादन

कोंकण भवनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतनिमित्त अभिवादन


कोकण भवन (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यवीर  त्र्यवीर समाजसुधारक वीनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कोंकण भवनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

वीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते.

 "सागरा प्राण तळमळला", "हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा", "जयोस्तुते", "तानाजीचा पोवाडा" ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत. १८५७ चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक लिहिले.