पत्रकार उत्कर्ष समिती रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी महामुंबई चॅनेलचे संपादक मिलिंद खारपाटील यांची निवड
उरण दि ८(विठ्ठल ममताबादे )पत्रकार उत्कर्ष समितीच्या सदस्यांची सभा रविवार दिनांक ७ एप्रिल २०२४ रोजी श्रीमती बारकुबाई पाटील विद्यालय रोडपाली तालुका कळंबोली, नवी मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.यावेळी अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे,उपाध्यक्ष राम जाधव,सचिव डॉ वैभव पाटील,खजिनदार डॉ शैलेश ठाकूर ,जेष्ठ पत्रकार राजेंद्र लकेश्री आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पत्रकार उत्कर्ष समितीच्या भविष्यातील कार्य ,वर्षा सहल,विद्यार्थी सन्मान सोहळा,पदाधिकारी निवड, कार्डचे नूतनीकरण याबद्दल विस्तृत चर्चा करण्यात आली . पत्रकार उत्कर्ष समिती मध्ये १५० हून अधिक पत्रकार सदस्य आहेत.पत्रकारिता करत असताना ज्या समाजात आपण रहातो त्या समाजाबरोबर आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान लक्षात ठेऊन अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात.आणि जिथे अन्याय होतो तिथे मदतीसाठी ,आवाज उठविण्यासाठी पत्रकार उत्कर्ष समिती आवर्जून उपस्थित असते असते असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. यावेळी काही जणांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात येऊन निवडपत्राचे वाटप करण्यात आले.महामुंबईचे संपादक, जेष्ठ पत्रकार मिलिंद खारपाटील यांची रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली .यावेळी पंडित धायगुडे, आत्माराम शेठ पाटील यांनाही सन्मानित करण्यात आले.सभेची सांगता राष्ट्रगीताने झाली.पत्रकार उत्कर्ष समिती रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी महामुंबई चॅनेलचे संपादक मिलिंद खारपाटील यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.