साई सम्राट लॉजवर पोलिसांचा छापा, चार महिलांची सुटका

 साई सम्राट लॉजवर पोलिसांचा छापा, चार महिलांची सुटका


नवीन पनवेल : वेश्याव्यवसायातून चार महिलांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. सुकापुर येथील साई सम्राट लॉजवर चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी कारवाई केली. तेथून चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून तेथे अवैध धंदा सुरू होता. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

   खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत सुकापुर येथील साई सम्राट  लॉज मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांचा पथकाने गुरुवारी रात्री बनावट ग्राहक तयार करून त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी तेथील चार महिलांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जीआरूल जोहरूल हक (राहणार भगतवाडी सुकापुर) संतोष गोविंद प्रसाद साकेत (मॅनेजर , रा. मध्य प्रदेश), अर्जुन राम लखन गोस्वामी (मॅनेजर, रा.झारखंड) आणि इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्याकडून मोबाईल फोन, रोख रक्कम, डीव्हीआर जप्त करण्यात आले. पनवेल- नवी मुंबई परिसरात बहुतांशी लॉज मध्ये वेश्या व्यवसाय सुरू आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी लक्ष देऊन करण्याची मागणी केली जात आहे